Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

दीर्घ विश्रांतीनंतर आर्द्रा नक्षत्रातील पावसाने बुधवारी (ता. २४) दुपारी दमदार हजेरी लावताच पाचोड (ता. पैठण) परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
Pachod farmer sowing

Pachod farmer sowing

sakal

Updated on

पाचोड - दीर्घ विश्रांतीनंतर आर्द्रा नक्षत्रातील पावसाने बुधवारी (ता. २४) दुपारी दमदार हजेरी लावताच पाचोड (ता. पैठण) परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे गुरुवारी (ता. २५) सकाळपासून खरिपाच्या अंतिम मशागतीच्या कामांना वेग आला असून अनेक ठिकाणी कापूस लागवडीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतशिवार गजबजून गेले असून बी-बियाणे व खतांच्या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com