हिंगोली जिल्ह्यात राष्‍ट्रवादी पडळकर यांच्या वक्‍तव्याविरोधात आक्रमक

nished
nished

हिंगोली ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा हिंगोलीत राष्‍ट्रवादी काँग्रेसतर्फे गांधी चौकात गुरवारी (ता. २५) जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला.

गांधी चौकात हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्‍वाखाली करण्यात आले. या वेळी आमदार पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोबत आणलेल्या बॅनरवरील गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून त्‍याचा निषेध नोंदविला. 

वक्‍तव्य अंत्यत चुकीचे 
या वेळी दिलीप चव्हाण म्‍हणाले, श्री. पडळकर यांनी केलेले वक्‍तव्य अंत्यत खालच्या दर्जाचे आहे. त्‍यांनी चुकीचे व्यक्‍तव्य केले आहे. शरद पवार यांच्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्राला जाण आहे. त्‍यांच्याबद्दल वक्‍तव्य करणे हे अंत्यत चुकीचे असून त्‍याचा निषेध करण्यात येत असल्याचे त्‍यांनी सांगितले. या वेळी श्री.चव्हाण यांच्यासह बालाजी घुगे, बी. डी. बागर, माधव कोरडे, कमलेश यादव, आमित कळासरे, इरू पठाण, केशव शाकंट, केदार डागे, भाऊराव ठाकरे, दत्तराव नवघरे, इमाम बेलदार, श्री. कऱ्हाळे, संतोष भालेराव, संचित गुडेवार, अशोक पाटील, पाडुरग नरवाडे, बबन बोचरे आदींची उपथिस्‍ती होती.

कळमनुरीत जोडे मारो आंदोलन
कळमनुरी ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जोडे मारो आंदोलन करुन निषेध केला. तहसीलच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी नगरसेवक हुमायून नाईक, प्रा गुलाब भोयर, समद लाला, म नजीम, उमेश गोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन करून निषेध केला. या प्रकरणी काही पदाधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी केली.

वसमत येथे निषेधाचे निवेदन देऊन आंदोलन
वसमत ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या त्‍या वक्‍तव्याचा निषेध करून उपविभागीय अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.मनोविकृतीला चाप बसण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना समज देवून त्‍यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम यांच्यासह माणिकराव भालेराव, गणेश वाल्‍हेकर, बालाजी ढोरे, विजय चव्हाण, ॲड. सोपान ढोबळे, प्रताप ढोबळे, नागेश ढोबळे, हनुमान बुलाखे, पांडूरंग ढोबळे, विश्वनाथ फेगडे, मुंजाजी दळवी, तानाजी बेंडे, संदीप कऱ्हाळे, दिलीप सोनटक्‍के आदींनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com