Dhangar Community : धनगर आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन; धनंजय मुंडेंनी 'ते' आश्वासन न दिल्यास आत्मदहनाचा इशारा!

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आम्हाला मागणी मान्य करण्याचे आश्वासन द्यावे.
Dhangar Community
Dhangar Communityesakal
Summary

शासनाने धनगर आरक्षणाच्या मागणीची दखल न घेतल्यास सात जून रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर केव्हाही व कुठेही आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

केज : धनगर समाजाचा (Dhangar Community) अनुसूचित जमातीत (एस. टी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी केकतसारणी येथील गावाला (Kekat Sarani Village) पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून दोन तरूणांनी काल (गुरूवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. सात जून पर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

तालुक्यातील केकतसारणी येथील आनंद धायगुडे व संदीपान धायगुडे या दोन तरूणांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत (Scheduled Tribes) समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन पाच जून रोजी तहसीलदारांना दिले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या दोन तरूणांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

Dhangar Community
मोसंबीची गोडी वाढली! परदेशात गरुडझेप घेणाऱ्या मोसंबीला प्रथमच बाजारपेठेत मिळाला उच्चांकी भाव, पण..

निवेदनात दिल्याप्रमाणे शासनाने धनगर आरक्षणाच्या मागणीची दखल न घेतल्यास सात जून रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर केव्हाही व कुठेही आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान पाणी पुरवठा विभागाचे विस्तार अधिकारी रोडेवार, तलाठी बी. के. शिंदे, ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे व पोलीस नाईक एस. बी. शेंडगे यांनी दुपारी आंदोलनस्थळी भेट देऊन आपल्या भावना वरिष्ठांसमोर मांडणार असल्याचे सांगूनही आंदोलक तरूणांचे समाधान झाले नाही.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आम्हाला मागणी मान्य करण्याचे आश्वासन द्यावे, अन्यथा दिलेल्या मुदतीत आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर कुठल्याही क्षणी आत्मदहन करणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यानंतर सायंकाळी सात वाजता शेळी-मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष बालासाहेब तोडतले यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलक तरूणांशी संवाद साधला आहे. रात्री साडेसात वाजताही आंदोलन सुरूच होते.

Dhangar Community
कारखानदारांसह सरकारला हादरे देणाऱ्या राजू शेट्टींचं नेमकं चुकलं कुठं? पराभवानंतर शेट्टींवर आत्मचिंतनाची आली वेळ!

नायब तहसीलदारांची आंदोलनाला भेट

निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण धस व अव्वल कारकून महादप्पा तोळमारे यांनी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भेट देऊन आपल्या भावना जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविण्यात आहेत. सध्या पावसाचे वातावरण असल्याने रात्रीच्यावेळी टाकीवर उंचावर थांबणे जिकरीचे आहे. आरक्षण हा राज्य व केंद्र शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने त्यास काही अवधी लागणार असल्याचे सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलक तरूणांनी आंदोलन काही काळासाठी स्थगित केल्याचे मान्य करत आंदोलन मागे घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com