Latur News : लातूर कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या राजस्थानच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.
लातूर : येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.