
अंबड : तालुक्यातील आलमगाव (हनुमाननगर) येथील युवा शेतकरी प्रल्हाद दत्तात्रय येळेकर यांनी प्रयोगशीलता जपत शेतात अकरा वर्षापूर्वी जांभूळ झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कष्ट, नियोजन आणि पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे आज त्यांची फळबाग बहरली आहे. या फळबागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.