
घनसावंगी : जालना जिल्ह्यातील साळेगाव घारे येथील विठ्ठल डिखूळे या शेतकऱ्याने मागेल त्याला शेततळे घेऊन क्षेत्र सिंचनाखाली आणले. सोबत प्रयोगशीलता जपत ड्रॅगनफ्रूट फळबाग लागवड, चारा उत्पादन, दुग्ध व्यवसाय व शेळीपालनाची जोड दिली. नियोजनबद्ध परिश्रमातून त्यांनी शेती फायद्याची असल्याचा संदेश दिला आहे.