

A car-bike collision near Bambhulgaon Phata claims the lives of three members of a family.
sakal
आष्टी (जि. बीड), : ‘आजोबा, दिवाळीला मला कपडे आणि फटाके आणायचेत,’ असा हट्ट करणाऱ्या दहा वर्षांच्या नातीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजोबा शेतातील कापूस विकण्यासाठी निघाले. मात्र, काळाने वाटेतच घाला घातला. अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावरील बांभूळगाव फाट्याजवळ भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात आजोबा, चुलत आजोबा आणि नात अशा तिघांचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. सात) रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली.