बीड - सर्व तयारी पूर्ण झाली, वऱ्हाडी मंडळ अक्षता घेऊन मंडपात पोचले, वधूपिता लगबगीनं पाहुण्यांची व्यवस्था करण्यात मग्न, डोक्यावर गजरा आणि अंगात लग्नाची साडी घालून दोन कोवळ्या मुलींच्या डोक्यावर अक्षता पडणार तोच पोलिस, ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विवाहस्थळी पोचले आणि दोन बालविवाह टळले.