उमरगा, (जि. धाराशिव) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत करण्यासाठी केंद्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रत्यक्षात वापर करण्यासाठी दहा हजार ३७२ कोटी रूपये खर्चाची तरतूद केली आहे, त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील विकसित महाराष्ट्र साकारण्यासाठी ए. आय. तंत्रज्ञानाचा आधार शेतीतील उत्पन्न दहापटीने वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असुन विठ्ठलसाई साखर कारखाना व शरण पाटील फाऊंडेशनने हाती घेतलेल्या एआय तंत्रज्ञानाचा उपक्रम राज्यात 'गेमचेंजर' ठरेल. असे मत राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.