Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

AI Sugarcane Farming, Water Conservation, Dharashiv Farmers: धाराशिव जिल्ह्यात ७७० शेतकऱ्यांनी उसाच्या शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
AI-powered sensors and drip irrigation help sugarcane farmers in Dharashiv improve water management and crop production.

AI-powered sensors and drip irrigation help sugarcane farmers in Dharashiv improve water management and crop production.

esakal

Updated on: 

धाराशिव: चांगला पाऊस झाल्यानंतर एखाद्या वर्षी प्रकल्प तुडुंब भरले तरी पुढील वर्षापर्यंत ते रिकामे होतात. ज्यामुळे धाराशिवसारख्या दुष्काळी जिल्ह्याला वारंवार तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीसाठा वेगाने आटण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे ऊस पिकासाठी होणारा भरमसाठ उपसा आणि पारंपरिक पाटाची पद्धत होय.

या समस्येवर मात करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञान धाराशिवसाठी अत्यंत प्रभावी, जीवनदायी ठरत आहे. जिल्ह्यातील तब्बल ७७० शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या शेतात हे आधुनिक तंत्रज्ञान यशस्वीपणे कार्यान्वित केले आहे. याद्वारे कोट्यवधी लिटर पाण्याची बचत होत आहे. दुष्काळी स्थितीतून बाहेर पडण्यासाठी हे तंत्रज्ञान जिल्ह्यासाठी वरदान ठरू लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com