नांदेड : एअर ऍबुलन्स धावपट्टीवर क्रॅश; नांदेड-मुंबई सेवा दोन दिवस बंद            

प्रल्हाद कांबळे        
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी अनिल काळे या युवकाचा ब्रेणडेड झाल्याने त्याचे अवयव मुंबई येथे पाठविण्याचा निर्णय रात्री घेण्यात आला. त्याचे हृदय रात्री मुंबईला नेत असताना नांदेड विमानतळावर एअर ऍबुलन्स धावपट्टीवरून क्रश झाली.

नांदेड : येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी अनिल काळे या युवकाचा ब्रेणडेड झाल्याने त्याचे अवयव मुंबई येथे पाठविण्याचा निर्णय रात्री घेण्यात आला. त्याचे हृदय रात्री मुंबईला नेत असताना नांदेड विमानतळावर एअर ऍबुलन्स धावपट्टीवरून क्रश झाली.

त्यानंतर हे अवयव घेऊन जाण्यासाठी दुसरे विमान बोलावण्यात आले. परंतु त्या विमानाला उड्डाणाची परवानगी दिली नाही. अखेर हे ग्रीन कॅरिडॉर अयशस्वी झाले. हा प्रकार रात्री दोन ते तीनच्या दरम्यान घडला. या घटनेमुळे चंदिगड, दिल्ली, मुंबई असी चालणारी विमानसेवा दोन दिवसासाठी बंद करण्यात आली आहे. चंदिगड-नांदेड आणि दिल्ली-नांदेड एअर इंडियाची सेवा बंद करण्यात आली असल्याची माहिती एअर इंडियाचे स्टेशन मॅनेजर याचे गजेंद्र गुट्टे यांनी सांगितले.

दरम्यान, हैदराबाद नांदेड-मुंबई सेवा ही दोन दिवसांसाठी बंद करण्यात आल्याचे विमानतळ व्यवस्थापक पद्मे यांच्याकडून सांगण्यात आले. धावपट्टीवरून पहिल्यांदाच विमान क्रॅश होण्याची घटना घडली असून, येणाऱ्या काळात याबाबत अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aircraft crashes on the runway in nanded