ajay maharaj baraskar
sakal
अंकुशनगर - मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनादरम्यान केलेली कथित आक्षेपार्ह आणि हिंसक वक्तव्ये समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचा आरोप करत अजय महाराज बारसकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून, अंबड पोलीस ठाण्यातही आपला जबाब नोंदवला आहे. तसेच संबंधित वक्तव्यांचे पुरावे असलेली पेनड्राइव्ह पोलिसांकडे सुपूर्द केली आहे.