Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Historical Springs from 1910 British Survey Still Flowing: सिल्लोड तालुक्यातील अजिंठा डोंगररांगेत १९१०च्या ब्रिटिश नकाशांतील दोन जिवंत झऱ्यांसह पर्यावरण अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी १४ नवीन नैसर्गिक झरे शोधली आहेत.
Beed News

Beed News

esakal

Updated on

सिल्लोड: ‘पाणी म्हणजे जीवन’ ही उक्ती सार्थ ठरवणारे निसर्गाचे अनेक चमत्कार आपल्या अवतीभोवती दडलेले आहेत. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने सिल्लोड तालुक्यातील अशाच नैसर्गिक आणि शाश्वत जलस्रोतांची (झरे) रंजक माहिती समोर आली आहे. १९१० मध्ये ब्रिटिशांनी शोधलेल्या दोन जिवंत झऱ्यांच्या ऐतिहासिक नोंदींसह, आता पर्यावरण अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी जिल्ह्यात आणखी १४ नवीन नैसर्गिक झरे शोधून काढले आहेत. निसर्गाचे हे ‘अमृतकुंभ’ आजही वन्यजीव आणि जैवविविधतेसाठी संजीवनी ठरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com