
Dhananjay Munde: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांच्या (गुरुवार-शुक्रवार) बीड जिल्हा दौऱ्यावर होते. ते बीडचे पालकमंत्री असल्याने अनेक विभागांच्या प्रशासकीय बैठका त्यांनी घेतल्या. त्यांच्या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे बाबरी मुंडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. या प्रवेशाच्या कार्यक्रमातून त्यांनी एक प्रकारे धनंजय मुंडेंना गर्भित इशारा दिलाय का? असाच प्रश्न उपस्थित होतो.