
परतूर (जि. जालना) : मंठा तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीवर बंधारा बांधून या परिसरातील शेती ओलिताखाली आणणार, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परतूर येथे शनिवारी (ता. १५) केले. माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या प्रवेशानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.