

ajit pawar
esakal
Beed Politics: नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप तर आमने - सामने लढलेच. पण, प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने धारुर व माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकी नऊ आणले. माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बाजीही मारली. मात्र, गुरुवारी पालकमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळी पवारांच्या टेबलवर सोळंके, चाऊस आणि जगतापांनी एकत्र आणि हसतखेळत नाष्टा केला. तर, खासदार बजरंग सोनवणेंनी पवारांच्याच हेलिकॉप्टरमधून लिफ्ट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.