
बीड : सिंचन, आरोग्य, शिक्षणाच्या पायाभूत सुविधा अपुऱ्या. त्यातच कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांनी ग्रासलेल्या बीड जिल्ह्यात विकासाची पहाट आता उजाडेल, अशी सामान्य जनतेची आशा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यामुळे उंचावली आहे. पालकमंत्री म्हणून त्यांच्या पहिल्या दौऱ्याला पहाटेपासूनच सुरवात झाली.