Ajit Pawar Passed Away : तेरचा लाडका जावई हरपला... ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar News : अजित पवार यांचा विवाह १९८५ मध्ये झाल्यानंतर तेरशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जुळले. व्यग्र राजकीय जीवन असूनही अजित पवार सासुरवाडीशी कायम जोडलेले राहिले. तेरकरांसाठी अजित पवार हे केवळ जावई नव्हे, तर गावाचा “हक्काचा माणूस” होते.
Villagers of Ter village gather with teary eyes to pay tribute to Ajit Pawar, remembering him as a loving son-in-law and a pillar of support for the community.

Villagers of Ter village gather with teary eyes to pay tribute to Ajit Pawar, remembering him as a loving son-in-law and a pillar of support for the community.

esakal

Updated on

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यामुळे बारामतीसह राज्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांची हे धाराशीव जिल्ह्यातील तेर गावचे जावई होते. दादांच्या जाण्याने सासुरवाडीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणींनी तेरकरांचे डोळे पाणावले. गावातील प्रत्येक घराचा आधार गेल्याची भावना व्यक्त होत असून, स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आपल्या लाडक्या पाहुण्याला श्रद्धांजली वाहिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com