ajit pawar sushma deshmukh and nitin deshmukh
sakal
फुलंब्री - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे फुलंब्रीशी नाते केवळ राजकीय दौऱ्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते रक्ताच्या नात्यांनी, संस्कारांनी आणि आपुलकीने घट्ट विणलेले होते. सत्तेच्या उच्च पदावर असतानाही अजितदादांनी कुटुंब, नाती आणि माणुसकी यांना नेहमीच अग्रक्रम दिला. फुलंब्रीतील त्यांची मावशी सुषमा शंकरराव देशमुख आणि मावसभाऊ नितीन देशमुख यांच्याशी असलेले हे जिव्हाळ्याचे संबंध आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.