
Latest Marathawada news: हॅलो सुनिल तटकरे बोलतो... बाबासाहेब पाटील तुम्हाला उदया मंत्रीमंडळात शपथ घ्यायची आहे...हा फोन शनिवारी (ता.१४) रात्री नऊच्या सुमारास आला आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश करीत फटाक्याची आतिषबाजी केली, रात्रीच्या वेळी शेकडो कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे निकटवर्तीय व विश्वासू आमदार म्हणून बाबासाहेब पाटील यांना ओळखले जाते.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघांचे आमदार बाबासाहेब पाटील यांची राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री म्हणून वर्णी लागणार आहे, आज नागपूर येथे होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात मतदार संघाला मंत्रिपद मिळणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.