Ajit Pawar sabha in Beed as reply to Sharad Pawar  review meeting of NCP leaders today political news
Ajit Pawar sabha in Beed as reply to Sharad Pawar review meeting of NCP leaders today political news

Ajit Pawar News : प्रत्युत्तरच नव्हे तर शक्तिप्रदर्शनही! बीडमध्ये शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवारांची जोरदार तयारी

बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १७) घेतलेल्या स्वाभीमान सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार ता. २७ ऑगस्टला प्रत्युत्तर देणार आहेत. याच सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारीही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केली आहे. सभेत काही बडे प्रवेश देखील होणार आहेत.

शरद पवारांचा येवला (जि. नाशिक) येथील सभेनंतर थांबलेला महाराष्ट्र दौरा बीडच्या स्वाभीमान सभेने पुन्हा सुरु झाला. जिल्ह्यात एकटे आमदार असतानाही सभेची जबाबदारी आमदार संदीप क्षीरसागर यांनी लिलया पेलून दाखविली. सभा होत नाही तोच बीडमध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ता. २७ ऑगस्टला प्रत्युत्तर सभा जाहीर करण्यात आली.

Ajit Pawar sabha in Beed as reply to Sharad Pawar  review meeting of NCP leaders today political news
Chandrayaan-3 Update : चांद्रयानचं आणखी एक पाऊल पुढे! उरले फक्त २५ किमी; मॉड्यूलचे अंतिम डीबूस्टिंगही यशस्वी

तयारीला वेग

आता या सभेच्या तयारीलाही वेग आला आहे. शरद पवार यांची सभा पारसनगरी मैदानावर झाली. यापेक्षा आकाराने मोठे असलेले छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल हे मैदान प्रत्युत्तर सभेसाठी निश्चित करण्यात आले आहे. आता सभेच्या पूर्वतयारीसाठी रविवारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक होणार असल्याची माहिती, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. प्रज्ञा खोसरे यांनी दिली.

Ajit Pawar sabha in Beed as reply to Sharad Pawar  review meeting of NCP leaders today political news
Mumbai : स्वप्न अधुरंच..! नुकताच झाला होता पर्मनंट, कारही केली होती बुक पण जोडप्याच्या मारहाणीत रेल्वेपुढे पडला अन्...

दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदार संघातून समर्थकांना आणण्यासाठी १५० बसची मागणी परिवहन महामंडळाकडे नोंदविली आहे. कार्यकर्त्यांची वाहने व इतर छोटी वाहने ही वेगळीच असणार आहेत. यासह स्थानिक बीड मतदार संघ आणि बाजूच्या गेवराई मतदार संघातून देखील उपस्थितांची संख्या लक्षणीय असेल असे नियोजन आखण्यात आले आहे. या सभेत काही बडे प्रवेश देखील करण्याचे नियोजन सुरु आहे.

सभेच्या निमित्ताने सत्ताधारी राष्ट्रवादीने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची सजावट करण्यासह शहरातील प्रमुख चौकांतील बॅनर देखील आतापासूनच बुक केले आहेत. धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्याकडे नियोजनाचे सर्व सूत्रे असून श्री. कराड व राजेश्वर चव्हाण शहरात तळ ठोकून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com