
गेवराई : राज्यातील जनतेने या महायुतीला भरभरून प्रतिसाद देत महायुतीला कौल दिला. यामध्ये गेवराई विधानसभा मतदार संघातून तुम्ही विजयसिंह पंडित यांना भरघोस मताने निवडून देत खंबीर साथ दिली.आता मी सरकार म्हणून त्यांना विविध विकास कामासाठी भरघोस निधी देऊन बळ देण्याचे काम करणार तर आहेच, शिवाय गेवराई शहराच्या हद्द वाढ व बायपास टू बायपास रस्त्यासाठी मी जातीने लक्ष घालून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार आसल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेवराईतील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी दिले.