
ऐतिहासिक ग्रंथसोहळा याठिकाणी संपन्न होत असून गुलाबी थंडीमध्ये या साहित्य मेळाव्याचा सर्वत्र आनंदोत्सव दिसून येत आहे. मोठ्या साहित्यिकांची बैलगाडीतून मिरवणूक काढली जात आहे.
उस्मानाबाद : संत गोरोबाकाकांच्या साहित्यनगरीत अखिल भारतीय साहित्य संमेलनला ग्रंथदिंडीने सुरुवात झाली आहे. श्री तुळजाभवानी स्टेडियम वरून या ग्रंथदिंडीला सुरुवात झाली.
या दिंडीच्या तयारीसाठी वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी सकाळपासून स्टेडियमवर जमा झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज अशा थोर पुरुषांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या. त्यासोबतच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची वेशभूषा असलेले विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले.
ढोल-ताशांच्या गजरामध्ये वारकरी संप्रदायाची वेशभूषा साकारलेले अनेक विद्यार्थी या मैदानावर जमले. एक ऐतिहासिक ग्रंथसोहळा याठिकाणी संपन्न होत असून गुलाबी थंडीमध्ये या साहित्य मेळाव्याचा सर्वत्र आनंदोत्सव दिसून येत आहे. मोठ्या साहित्यिकांची बैलगाडीतून मिरवणूक काढली जात आहे.
शेतकऱ्यांना मदत
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. तब्बल 92 संमेलनानंतर या उस्मानाबाद नगरीला यजमान पदाचा मान
प्रथमच मिळाला आहे. या मातीतील एक शेतकरी वर्ग सातत्याने मृत्यूला कवटाळतोय. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात 711शेतकरी आत्महत्या झालेले आहेत. या वर्गाला थोडाथोडका आधार देण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी दोन दिवसात प्रयत्न केले आहेत.
हारतुरे स्वीकारण्याचे ऐवजी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत अशा लोकांना अशा कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या माध्यमातून सुमारे 13 लाख रुपयांची रक्कम जमा झाली असून जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत, अशा कुटुंबियांना मदतीचा हात दिला जात आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी त्यासंदर्भात सकाळ कडे ही माहिती दिली आहे.