Beed : नाटकांसह दिग्गज कलावंत बीडकरांच्या भेटीला ; आज विभागीय नाट्यसंमेलन,नाट्यदिंडीने सुरवात

प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे, चंद्रकांत कुलकर्णी असे दिग्गज कलावंत आणि ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, ‘येता उष:काल हा’, ‘मराठी पाऊल पडती पुढे’, अशा प्रसिद्ध नाटक आणि विविध दर्जेदार कार्यक्रमांची बीडकरांना आज (शुक्रवारी, ता. दोन) मेजवानी भेटणार आहे. शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने येथील पारसनगरीच्या मैदानावरील दिवंगत केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरी व दिवंगत सुहासिनी इर्लेकर रंगमंचावर विभागीय नाट्यसंमेलन होणार आहे.
Beed
Beedsakal

बीड : प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे, चंद्रकांत कुलकर्णी असे दिग्गज कलावंत आणि ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, ‘येता उष:काल हा’, ‘मराठी पाऊल पडती पुढे’, अशा प्रसिद्ध नाटक आणि विविध दर्जेदार कार्यक्रमांची बीडकरांना आज (शुक्रवारी, ता. दोन) मेजवानी भेटणार आहे. शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने येथील पारसनगरीच्या मैदानावरील दिवंगत केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरी व दिवंगत सुहासिनी इर्लेकर रंगमंचावर विभागीय नाट्यसंमेलन होणार आहे.

Beed
Beed News : अपुऱ्या जागेमुळे गर्भवतींची हेळसांड ; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार,रुग्णसंख्या वाढल्याचा परिणाम

नाट्यदिंडीने संमेलनाची सुरवात होईल. अभिनेते व अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे, चंद्रकांत कुलकर्णी, सचित पाटील, गौरी कुलकर्णी, निलम शिर्के, विशाखा सुभेदार, प्रियदर्शन जाधव, पंढरीनाथ कांबळे, संदीप पाठक, सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, राजेश्वरी खरात, श्वेता खरात, जुई बेनखळे, विदिशा मसकर, अंशुमन विचारे, कमलाकर सातपुते, आनंदी जोशी, मयूर सुकाळे, सावनी दातार, सुदीप सबनीस, निनाद जाधव, डॉ. गणेश चंदनशिवे, माया खुटेगावकर, पुनम कुडाळकर, अर्चना सावंत, अर्चना जावळेकर, दीप्ती आहेर, संगीता लाखे, शुभम बोराडे, अनामिका आहिरे, सुशांत शेलार आदी दिग्गज कलावंत संमेलनाला हजर राहतील.

त्याच बरोबर मराठी पाऊल पडते पुढे (महाराष्ट्राची लोकधारा), संदीप पाठक यांचा वऱ्हाड निघालयं लंडनला हे एकपात्री नाटक, येता उषःकाल हे कार्यक्रम तसेच दिग्गज कलावंतांचा कलावंतांशी गप्पा हे नाटकातील नाटक कार्यक्रमात चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, प्रशांत दामले, गणेश चंदनशिवे, सचित पाटील, गौरी कुलकर्णी सहभागी होतील.

सायंकाळी संगीत रजनी होणार आहे. सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, राजेश्वरी खरात, श्वेता खरात, जुई बेनखळे, विदिशा मसकर, अंशुमन विचारे, कमलाकर सातपुते, आनंदी जोशी, मयूर सुकाळे हे कलावंत सहभागी असतील.

संमेलन अभूतपूर्व होणार; साक्षीदार व्हा : डॉ. क्षीरसागर

शहर नव्हे तर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असलेले १०० वे नाट्य संमेलन बीडमध्ये होत आहे. अभूतपूर्व संमेलनाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले.पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होईल.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विश्वस्त तथा माजी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, माजी राज्यमंत्री सुरेश नवले, माजी आमदार अमरसिंह पंडित यांचीही उपस्थिती असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com