परळी वैजनाथ - यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तालुक्यातील पांगरीचा अक्षय मुंडे यूपीएससीचीच्या यादीत झळकला. आईने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने अक्षय ने प्रचंड मेहनत घेत हे यश संपादन केले आहे..अक्षयच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यात वडिलांचे छत्र बालपणीच हरवलेले अशा प्रतिकुल परिस्थितीत तालुक्यातील पांगरी चा अक्षय संभाजी मुंडे हा गावातील भगवान बाबा विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने परळीच्या न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे प्रवेश घेतला.२०१२ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने लातूर येथील एमआयटी कॉलेजमध्ये बीडीएस साठी प्रवेश घेतला. बीडीएस ही वैद्यकीय शाखेची पदवी घेऊन तो डॉक्टर झाला होता तरीपण त्याचे मन मात्र या क्षेत्रात अजिबात रमत नव्हते. आपण काहीतरी वेगळे करून दाखवावे ही भावना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती..आपल्या आईने आपल्यासाठी जे कष्ट उपसले त्या कष्टांचे चीज करायचे असेल तर आपण याहीपेक्षा एखादे मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या विचाराने त्याने थेट पुणे गाठले. तेथे जाऊन त्याने स्पर्धा परीक्षांसाठी तयारी सुरू केली.पुणे येथून दोन वर्षांपूर्वी तो नवी दिल्ली येथे गेला व स्पर्धा परीक्षांसाठी त्या ठिकाणी योग्य असे मार्गदर्शन मिळवत त्याने प्रचंड मेहनत सुरू ठेवली. अक्षयला अक्षता नावाची एक विवाहित बहीण असून त्याची आई आजही शेतामध्ये काम करते..पतीच्या निधनानंतर अत्यंत बिकट अशा परिस्थितीत त्या माऊलीने अक्षयला शिक्षणासाठी लातूर असो, पुणे असो की दिल्ली असो कुठेही मागे वळून पाहू दिले नाही. आईचे प्रचंड कष्ट, बहिणीची साथ आणि त्या दोघींनी त्याच्यासाठी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अक्षयने दिवस रात्र एक केले.अभ्यासा व्यतिरिक्त त्याने बाकी सर्व अनावश्यक गोष्टी बाजूला ठेवल्या आणि त्यामुळेच मुंडे कुटुंबाला आणि पांगरी गावाला आजचा हा भाग्याचा दिवस पाहण्याचा योग आला. देशातील प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या यूपीएससीच्या परीक्षेत त्याने ६९९ वी रँक मिळवत विजयाची माळ खेचून आणली..त्याच्या ह्या उत्तुंग यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार, गावकरी, नातेवाईक,तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद या सर्वांनी मनापासून आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, सचिव आमदार सतीश चव्हाण, कार्यकारणीचे सर्व सदस्य, शालेय समितीचे अध्यक्ष नानासाहेब सोळंके, प्राचार्य श्रीनिवास देशमुख, उपप्राचार्य सुनील लोमटे या सर्वांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.