
छत्रपती संभाजीनगर : अक्षय्य तृतीया आणि आंबा या दोन्हीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आंबा शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो, तसेच त्याचे सेवन केल्याने आरोग्यालाही फायदा होतो. त्यामुळे या दिवशी आंबा खाण्याची आणि त्याची पूजा करण्याची प्रथा आजही पाळली जाते, त्या अनुषंगाने शहरातील प्रमुख बाजारपेठांत विविध राज्यातील आंबा दाखल झाला. मराठवाड्याचा केशरही उपलब्ध झाला. केशरने मात्र चांगला भाव खाल्ला. होलसेलमध्ये प्रतिकिलो १८०, तर किरकोळ बाजारात २०० रुपये किलोवर भाव आहे.