
हरेंद्र केंदाळे
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनंतर राज्यात दारूच्या किमतीत तीन वेळा वाढ झाली. आता नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२५ पासून शासन १५ टक्के दरवाढ लागू करण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास यामुळे बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांवर वार्षिक ४१ हजार ३२६ रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. ग्राहकांनाही दारू महाग मिळणार आहे. दिवाळीच्या काळात हॉट ब्रँड्ससह सर्व प्रकारच्या दारूचे दर वाढले. त्यानंतर रेड वाइन आणि पोर्ट वाइन महागल्या. अलीकडेच बडवायजर (मॅग्नम) बीअरच्या किमतीत वाढ झाली. आता एप्रिलपासून सर्वच प्रकारच्या दारूच्या दरांत वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.