परभणीत गांजासह दारू जप्त

file photo
file photo

परभणी : शहर वाहतूक शाखेच्या पथकाने वाहनांच्या तपासणी दरम्यान, शनिवारी (ता. २१) रात्री गांजा, अवैध दारूसह एकूण चार लाख ३९ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली. 

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री कारवाई करत होते. पेट्रोलिंग करत असताना रात्री नऊच्या सुमारास उड्डाणपुलावर आल्यावर त्या ठिकाणी त्यांना एक (एम. एच. ०३ - बी. सी. ३०५१) चारचाकी वाहन दिसले. पोलिसांना पाहताच काही जण पळून गेले. 

युवकांना विचारणा केली
संशय आल्याने पोलिसांनी वाहनातील युवकांना विचारणा केली असता वाढदिवस साजरा करत आहोत, असे युवकांनी सांगितले. त्यानंतर वाहनाची पाहणी केल्यावर त्यामध्ये १३४ ब्रास गांजा, अवैध दारू आणि इतर साहित्य मिळून आले. पोलिसांनी एक चारचाकी, दारू, मोबाईल, असा एकूण चार लाख ३९ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक श्री. सरोदे यांच्या फिर्यादीवरून किशोर रावसाहेब उबाळे, प्रदीप रामराव बुडगे, अशोक रामकिशन लोंढे, वशिष्ठ बाळासाहेब घुले, दत्तात्रय काशीनाथराव नंद, राजाभाऊ पिराजी आव्हाडे यांच्या विरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.


हेही वाचा ​
विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न
पूर्णा : कपड्याचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण करीत विष पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासू, सासरा व नवऱ्याविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शुक्रवारी (ता. २०) सुहागण येथील एका विवाहितेस तिच्या सासरच्या मंडळीने कापड दुकान टाकण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावत मारहाण केली. तर सासू, सासरा व नवरा यांनी संगनमत करून तिला विषारी औषध पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सासू लक्ष्मी सिद्धमाजी भोसले, नवरा सोनाजी भोसले, सिद्धमाजी भोसले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नागरगोजे हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com