विलगीकरण कक्षास रामदास तांडावरील सर्व सोयीयुक्त इमारत

file photo
file photo

नांदेड : नांदेड जिल्ह्याचे सुदैव म्हणा की जिल्हा प्रशासनाची कसरत यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराची लागण झाली नाही. भविष्यात या आजाराची लागन झाल्यास संशयीत रुग्णांना विलगीकरण (आयसोलेट) ठेवण्यासाठी रामदास तांडा (ता. लोहा) येथील १०० खाटा बसतील अशी हवेशीर व सर्व सोयीयुक्त इमारत या राष्ट्रीय कार्यासाठी घ्यावी असे निवेदन प्रा. डी.आर. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.  

नांदेड शहरापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर रामदास तांडा अभयारण्य आहे. या अभयारण्यामध्ये विविध पशु- पक्षी, विविध आयुर्वेद औषधीं वनस्पती आणि विविध उपयोगी झाडे असलेला हा भाग अभयारण्य म्हणून नावारुपास येत आहे. मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, आयुर्वेद रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ट डॉक्टर्स आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी जातात. शेकडो एकरमध्ये पसरलेल्या या अभ्यारण्याला अनेकांनी पर्यटनस्थळ म्हणून पहावयास जातात. तेथे विविध जातीचे साप, पक्षी, वनस्पती आणि झुळझुळणारे पाणी असा हा निसर्गरम्य परिसर मनाला शांती देतो.


जिल्हा व पोलिस प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमाची पावती 

सध्या संबंध जगाला कोरोना या वैश्‍विक आजाराने त्रस्त केले आहे. जगात व देशात या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. विशेष म्हणजे नांदेड हे सध्या ग्रीनझोनमध्ये असून जिल्हा व पोलिस प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमाची पावती असल्याचे बोलल्या जाते. प्रशासनाच्या आवाहनाला नांदेडकरांनीही साथ दिली. अत्यावश्‍यक सेवेसाठीच नागरिक घराबाहेर पडत आहेत. सर्वांच्या परिश्रमाला यश मिळत आले. नांदेडच्या पायथ्याशी आलेल्या कोरोनाला जिल्ह्यात शिरकाव करता आला नाही. अनेक घुसखोरांनी प्रयत्न केले मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे हे शक्य झाले नाही. 

विष्णुपूरी रुग्णालयापासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर

रामदास तांडा अभयारण्याची देखभाल व दुरुस्तीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे प्रा. डी. आर. पवार यांनी या राष्ट्रीय कार्यात आपलाही वाटा असावा म्हणून निसर्गरस्य परिसरातील व गरज भासल्यास कोरोना संशयित रुग्णांना विलगीकरण (आयसोलेट) १२० बाय ८० फुट बांधकाम असलेली इमारत देऊ केली. विद्यूतीकरण, पाण्याची सोय, हवेशीर व सर्व सोयीयुक्त आणि १०० खाटा बसतील अशी इमारत जिल्हा प्रशासनाने घ्यावी अशी विनंती केली. विष्णुपूरी रुग्णालयापासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर असल्याने प्रशसानालाही जवळ पडु शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com