उदगीरमध्ये एसीबी पथक दाखल झाल्याच्या चर्चेने अनेक कर्मचाऱ्यांची दांडी

युवराज धोतरे
मंगळवार, 30 जून 2020

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पथक मंगळवारी (ता.३०) लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात दाखल झालेल्या चर्चेने अनेक शासकीय कार्यालयातील विविध विभागांतील कर्मचारी कार्यालयातून दांडी मारल्याचे दिसून आले. हे पथक दाखल झाल्याची माहिती बाहेर पडलीच कशी? अशी चर्चा शहरात सुरू आहे.

उदगीर (जि.लातूर) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पथक मंगळवारी (ता.३०) उदगीर शहरात दाखल झालेल्या चर्चेने अनेक शासकीय कार्यालयातील विविध विभागांतील कर्मचारी कार्यालयातून दांडी मारल्याचे दिसून आले. हे पथक दाखल झाल्याची माहिती बाहेर पडलीच कशी? अशी चर्चा शहरात सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलिसांचा महत्त्वाचा विभाग आहे.

शासकीय, निमशासकीय सर्व कार्यालयांत लाच मागणे किंवा स्वीकारणे यावर त्यांची करडी नजर असते. या विभागाकडे तक्रार केल्यास त्यास सापळा रचून पकडले जाते. या विभागाची मोठ्या प्रमाणावर शासकीय कार्यालयांमध्ये दहशत असते. हा लोकशाहीतला फार मोठा कणा असलेला पारदर्शक म्हणून काम करणारा हा विभाग समजला जातो. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक उदगीर शहरात दाखल झाल्याचे खात्रीलायक माहिती खाकी विभागातील काही कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी मग इतर कार्यालयातील आपापल्या मित्रांना सांगितले. त्यामुळे अनेक कार्यालयातून अनेक कर्मचारी मंगळवारी दांडी मारल्याचे दिसून आले.

साठ वर्षांपुढील व्यक्ती दिसल्यास दुकान सील, लातूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

कामावर असलेले अनेक कर्मचारी दक्ष राहून न बोलताच काम करताना दिसून आले.
ही वार्ता वाऱ्यासारखी शहरभर पसरली व काही काम असणारे नागरिकांनीही आज काम होणार नाही याची खात्री असल्याने शासकीय कार्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे दिवसभर शहरात या विषयाची चर्चा चवीने चर्चिली जात होती. ही माहिती नेमकी कोठून बाहेर आली याचा शोध होणे महत्त्वाचे आहे. अतिशय महत्त्वाचा असलेला हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशाप्रकारे माहिती देऊन जर एखाद्या ठिकाणी जात असेल तर त्यांच्या जाण्याला कुठलाही अर्थ उरणार नाही आणि लाच घेणाऱ्यावर आळा बसणे तर सोडाच उलट लाचखोरी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढण्यासाठी मदत केल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे यांची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Government Employees Not Attend Office Due To ACB Udgir