esakal | हिंगोलीत सर्व बाजारपेठ सुरु, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचा पुढाकार

बोलून बातमी शोधा

file photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढी पाडवा, रमजान यामुळे बाजारपेठ सुरु ठेवण्याची मागणी करत व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता. १२) दुकाने सुरु केली आहेत. 

हिंगोलीत सर्व बाजारपेठ सुरु, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचा पुढाकार
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. ते संक्रमण रोखण्यासाठी काही दुकाने बंद आहेत. यात कपडा, रेडिमेड, सराफा, आदीचा समावेश आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढी पाडवा, रमजान यामुळे बाजारपेठ सुरु ठेवण्याची मागणी करत व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता. १२) दुकाने सुरु केली आहेत. 

यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरने पुढाकार घेतला आहे. सकाळी अकरा वाजता शहरातील व्यापारी गांधी चौकात एकत्र येत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरने घेतलेल्या निर्णयाची माहिती व्यापाऱ्यांना देत बंद असलेली दुकाने सुरु करा असे सांगत दुकाने सुरु केली आहेत. आगामी सण लक्षात घेता प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे शासनाने करोना संदर्भात दिलेले नियम पाळत व्यापार सुरु करण्याचे आश्वासन देत सर्व दुकाने सुरु करण्यात आली आहेत.

हेही वाचा - हिंगोली : कला ही मुलांना स्वतः च्या पायावर उभं करते- चित्रकार शिवराज जगताप

दरम्यान, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरने व्यापाऱ्यांना सुचना केल्या आहेत. यात संभावित संपूर्ण लॉकडाऊनपूर्वी व्यापारी व व्यावसायिकांना बर्‍याच सरकारी कामकाजाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायचे आहेत. विविध गोष्टींचा विचार करुन सोमवारपासून आपला व्यापार सुरु करणे हीसुद्धा आपली एक गरज बनली आहे.

दुकान मालक व दुकानातील कर्मचारी यांनीसुद्धा मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्कशिवाय ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये. दुकानात गर्दी कमीत कमी होईल याची दक्षता घ्यावी. सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा अशा सुचना दिल्या आहेत. त्याचे पालन करण्याचे आश्वासन देत दुकाने सुरु झाली आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे