

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Sakal
उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयात हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर शहरातील महात्मा फुले नगर येथील एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.२०) घडली आहे. मैनाबाई रविराज सलके असे मृत महिलेचे नाव असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.