
धाराशिव : तेलंगणातील अल्प्राझोलमयुक्त ताडी प्रकरणाचे धागेदोरे उमरगा (जि. धाराशिव) आणि साताऱ्यात असल्याचे तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्यूरो आणि तेलंगणातील बोधन ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. संबंधित संशयितांना अटक केल्यानंतर या रॅकेटचे मूळ महाराष्ट्रात असल्याचे उघडकीस आले आहे.