Crime
sakal
देगलूर - तालुक्यातील लिंगन केरूर ग्रामपंचायतीचे सरपंच बालाजी कदम यांच्यावर शुक्रवारी रात्री शहरातील मंजू हॉटेलमध्ये काचेच्या बाटलीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात देगलूर महाविद्यालयातील दोन प्राध्यापकाविरोधात जिवे मारण्याच्या प्रयत्नासह गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.