

Jalna News
esakal
अंबड: सध्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी रस्ते ओस पडत असतानाच, अंबड तालुक्यातील हारतखेडा-शेवगा परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर मात्र जिवाची पर्वा न करता रखरखत्या उन्हात शेतीची कामे करताना दिसत आहेत.