

Two killed in a horrific truck-wagonr collision on Ambad-Jalna highway
Sakal
अंबड : अंबड जालना महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ट्रक व वॅगनरचा शनिवारी (ता.27) मध्यरात्री साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, यामध्ये जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील दोघे व टेंभुर्णी येथील एकजण असे तिघे कुंभारझरी येथून मढी येथे देवदर्शनासाठी वॅगनर क्रमांक एम. एच.14 सी. सी.7114 जालनाकडून अंबडकडे जात असताना अंबड शहरालगत असलेल्या अंबड -जालना महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपातून जालना शहराकडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.9599 ची जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला.