

Severe Head-On Collision on Ambad–Pachod Highway
Sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरालगत अंबड - पाचोड महार्गावरील मार्डी फाट्यावर शनिवारी (ता.17) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये सहा प्रवाशी गंभीर जखमी तर दोंघाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,जालना तालुक्यातील माळीपिंपळगाव येथील ग्रामस्थ हे बोलोरो मढी येथे अमावस्यामुळे देव दर्शनासाठी जात असताना बोलेरो कार व ट्रक (क्रमांक MH-40-TC-2587) सोबत समोरासमोर जोरदार धडक झाली.