
शेंदूरवादा : शेंदुरवादा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी रविवार (दि. 8) रोजी सावखेडा गावात जाऊन प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकर्यांनी तक्रारीचा पाढा वाचताच त्यांनी दहेगाव बंगला (ता. गंगापूर) येथील एका कृषी दुकानवर कृषी अधिकार्याच्या पथकासह छापा मारला. त्यामुळे दहेगाव भागात मोठी खळबळ उडाली.