

Kannad Farmer Families Struggle With Debt Ambadas Danve Seeks Attention To Loan Burden And Delayed Relief Measures
esakal
कन्नड: “कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांच्या व्यथा संपत नाहीत. एका शेतकऱ्याच्या आजोबांचे कर्ज त्याच्या वडिलांच्या डोक्यावर आले. आता वडील गेल्यानंतर तेच कर्ज मुलाच्या डोक्यावर येणार आहे. हे कुणाला सांगायचे? कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. जीव देण्याची कोणाला हौस नसते,” अशी टीका माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी (ता. २४) केली.