
अंबाजोगाईः स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रसूती विभागात बाळाचा जन्म झाला, मात्र या बाळाचे पल्स आणि हृदय सुरू नसल्याने डॉक्टरांनी हे बाळ मृत असल्याचे समजून नातेवाइकांकडे सोपविले होते. परंतु, अंत्यसंस्कारावेळी या बाळाची हालचाल सुरू झाली आणि ते रडू लागले. तेव्हा त्या आईने बाळाला पुन्हा उपचारासाठी स्वारातीमध्ये दाखल केले. मंगळवारी हा प्रकार घडला असून, सध्या या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.