

Beed News
esakal
अंबाजोगाई: जेव्हा कष्टाने पिकवलेला माल बाजारपेठेत नेला जातो आणि तिथे मातीमोल भाव मिळतो, तेव्हा कोणताही शेतकरी हताश होतो. मात्र, देवळा येथील रवींद्र देवरवाडे यांनी या संकटालाच संधीत बदलले. बटाट्याचा भाव किलोमागे ८ रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने त्यांनी हताश न होता, १५०० किलो बटाट्यांवर स्वतःच प्रक्रिया केली आणि चविष्ट चिप्स तयार केले. आज ज्या बटाट्याला ८ रुपये भाव मिळणे कठीण झाले होते, त्यावर प्रक्रिया केल्याने त्याला २०० ते २५० रुपये किलोचा उच्चांकी दर मिळत आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे एका अशा शेतकऱ्याची, ज्याने केवळ शेती पिकवली नाही, तर ती एका उद्योजकाच्या जिद्दीने विकूनही दाखवली.