Ambajogai Thief Arrested
sakal
बीड - अंबाजोगाई शहरात बंद घर फोडून लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. ५० हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे चाळून, कपड्यांचे पुरावे शोधून आणि परळीत सापळा रचून पोलिसांनी या टोळीचा छडा लावला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून २७ तोळे (२७० ग्रॅम) सोने आणि ८५८ ग्रॅम चांदीचा मौल्यवान मुद्देमाल जप्त केला आहे.