अंबाजोगाई : शहरातील एका युवतीने शनिवारी (ता. १२) दुपारी मुकुंदराज मंदिराजवळील (Mukundraj Temple) कड्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शहर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोचल्याने त्यांनी या युवतीला वर काढून स्वारातीमध्ये उपचारासाठी दाखल केले. राधा नरेश लोमटे (वय २२, रा. खडकपुरा) असे त्या युवतीचे नाव आहे. ही युवती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.