
अंबाजोगाई, ता. ३० (बातमीदार) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी (ता.३०) दुपारी चालानची रोख रक्कम भरण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांची १ लाख ८९ हजार २१२ रुपयांची रोकड चोराने लंपास केल्याची घटना घडली.
येथील नगर पालिकेतील कर्मचारी भिकाजी दामोदर शिंदे हे चालानची रक्कम भरण्यासाठी बँकेत आले होते. आल्यानंतर त्यांनी पैशाची बॅग बँकेतील टेबलवर ठेवली होती. त्याठिकाणी उपस्थित चोराने शिंदे यांची नजर चुकवून ही पैश्याची बॅग लंपास केली.
.