Vidhan Sabha 2019 : अमित, धीरज देशमुख यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांनी आज (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

लातूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांनी आज (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

धीरज देशमुख यांना काँग्रेसने लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी दिली तर त्यांचे बंधू अमित देशमुख यांना लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. आत्तापर्यंत काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये अमित आणि धीरज यांच्या नावांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit and Dheeraj Deshmukh File Nomination Form Maharashtra Vidhan Sabha 2019