

लातूर : राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून महायुतीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारचा पायाच भ्रष्ट आहे. त्यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यातील जनता कंटाळली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यापेक्षा जास्त यश विधानसभा निवडणुकीत मिळेल. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल. त्यानंतर ही आघाडी मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवले, असा विश्वास काँग्रेसचे स्टार प्रचारक, लातूर शहर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले.