

Amol Khune was reportedly assaulted at Nagnath Temple in Pali, Beed district, prompting a police investigation into the incident.
esakal
बीड : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी परंतु नंतर त्यांच्या विरोधात गेलेले अमोल खुणे यांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना पाली (ता. बीड) येथील नागनाथ मंदिरात रविवारी (ता. ११) दुपारी घडली. ‘‘नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला आपल्याला जाता येऊ नये, या सुनियोजित उद्देशानेच हा हल्ला करण्यात आला’’, असा दावा खुणे यांनी केला. बीड ग्रामीण पोलिस या प्रकाराची कसून चौकशी करीत आहेत.