

Amol Khune alleges that he was attacked near Nagnath Temple in Pali, Beed district, and claims both his hands were injured
esakal
बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर बीड तालुक्यातील पाली येथील नागनाथ मंदिर परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेले असताना काही तरुणांनी गेट बंद करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप खुणे यांनी केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना दुखापत झाली असून, बीड जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर खुणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत, यापुढे शांत बसणार नसल्याचा इशारा दिला आहे. मात्र, हल्ल्यामागे जरांगे यांचाच हात असल्याचा त्यांचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही.