मराठा आरक्षण : मराठा युवकांकडून परभणीत निषेध आंदोलन

बुधवारी शहरात निदर्शने करून राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षण : मराठा युवकांकडून परभणीत निषेध आंदोलन
Summary

या निर्णयामुळे मराठा समाजातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राज्य सरकार या कायद्याला न्यायालयीन प्रक्रियेत टिकविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आला. बुधवारी या निषेधार्थ मराठा समाजातील काही युवकांनी एकत्र जमत राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

परभणी : मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) याचिकेवर सर्वोच्य न्यायालयाने बुधवारी (ता.पाच) महत्वाचा निकाल दिला. राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा (maratha reservation)कायदा न्यायालयाकडून रद्द (Cancelled) करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी शहरात निदर्शने करून राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. (An agitation took place in parbhani after the maratha reservation law was canceled by the court)

मराठा आरक्षण : मराठा युवकांकडून परभणीत निषेध आंदोलन
लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन !

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्य न्यायालयाने निकाल देत हा कायदा रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे मराठा समाजातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राज्य सरकार या कायद्याला न्यायालयीन प्रक्रियेत टिकविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आला. बुधवारी या निषेधार्थ मराठा समाजातील काही युवकांनी एकत्र जमत राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात हे युवक एकत्र जमले होते. मराठा क्रांती मोर्चा परभणीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात बोंबलो आंदोलन करण्यात आले. तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी बोलतांना कार्यकर्त्यांनी आजपर्यंत मराठा समाजातील युवकांनी दिलेले बलिदान कदापी व्यर्थ जाऊ देणार नाही असे सांगण्यात आले. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक किशोर रणेर, गजानन जोगदंड, बालाजी मोहीते, आकाश कदम, शिवाजी मोहिते, गोपाळ कदम, अरुण पवार, गजानन लव्हाळे, अमोल हुड्के, अमोल अवकाळे, स्वप्नील गरूड, रवि घयाळ यांनी आंदोलनात आपला सहभाग नोंदविला.

"केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. केवळ ऐकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम दोन्ही सरकार करत आहेत. एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी संघर्ष करावा लागतो याची राज्यकर्त्यांनी गंभीर दखल घ्यायला पाहिजे होती. परंतु तसे झाले नाही."

- किशोर रणेर, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा, परभणी

(An agitation took place in parbhani after the maratha reservation law was canceled by the court)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com