monkey and dog puppy
sakal
पाथरी (जि. परभणी) - माणुसकी आटत चालल्याची ओरड होत असतानाच, निसर्गाच्या कुशीत मात्र रक्ताच्या नात्यापलीकडचे एक अनोखे नाते पाहायला मिळत आहे. तुरा (ता. पाथरी) येथे गेल्या दहा दिवसांपासून वानर (मादी) कुत्र्याच्या पिलाचा सांभाळ करत आहे. एकमेकांचे हाडवैरी समजल्या जाणाऱ्या या प्राण्यांतील आगळ्यावेगळ्या मातृत्वाची चर्चा परिसरात रंगली आहे. हा जिव्हाळा पाहून नागरिक थक्क होत आहेत.